Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. शहरात रस्त्याच्या कामाला गती आली आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे राहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत  रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन देऊन भाजपने पालिकेची सत्ता काबीज केली. मात्र गेल्या चार वर्षात  रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्यामुळे शहर वर्षांमध्ये  तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  यात मुख्य अडथळा हा अमृत योजनेचा असल्याने रस्त्याचे काम रखडले होते. मात्र आता 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता शहरात रस्त्याच्या कामाला गती आली आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे राहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात अमृत योजनेच्या खोडकामामुळे तर जे काही थोडेफार सुस्थितीत असलेले रस्ते देखील भकास झाले. अमृत योजनेत जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यांच्या कामांना खीळ बसली होती. मात्र आता जवळपास 90 टक्के जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने रस्त्यांच्या कामांना गती आली आहे. नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये देखील रस्ते डांबरीकरण सुरू झाले आहे. या प्रभागात महामार्गापासून वांजोळा रोड, केळकर हॉस्पिटल, आकाश फोम, श्रीराम मंदिर पासून काशी विश्वेश्वर मंदिर, हनुमान नगर, श्रीरामनगर या भागात डांबरीकरण केले जात आहे. चार ते सहा महिन्यात संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल याच्या निविदा देण्यात आल्या असून संपूर्ण रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. काही ठिकाणी नळजोडणीचे काम बाकी असून नळ कनेक्शनसाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असून मधील भाग सोडून सर्व प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व रस्त्याचे काम केले जाणार आहे. असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सांगितले. भाजप माजी शहराध्यक्ष पुरूशोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, डॉ.आजनालकर, डॉ. किरेंगे, ठाकूर काका, निलेश वानखेडे, मोद सरोदे भाऊ, गुड्डू सोनार, कॉन्ट्रॅक्टर बढे, डॉ. आशुतोष केळकर, वॉर्डतील जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. 

 

Exit mobile version