Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी सोनी बारसे यांची अविरोध निवड

भुसावळ प्रतिनिधी  ।  येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. सोनी संतोष बारसे यांची आज झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

ज्येष्ठ नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी आधीच उपनगराध्यक्षपदी सौ. सोनी संतोष बारसे यांची निवड होणार असल्याचे घोषीत केले होते. या अनुषंगाने आज या निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी त्यांचाच एकमेव अर्ज आला. यामुळे निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी असलेले तहसीलदार दिपक धिवरे त्यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह नगरपालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक युवराज लोणारी,मनोज बियाणी,राजेंद्र नाटकर, निर्मल कोठारी, मुकेश पाटील, दिनेश राठी, शैलजा नारखेडे,शोभा नेमाडे,  महेंद्र सिंग ठाकूर, गिरीश महाजन, पुष्पाबाई बत्रा, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे दिपाली बर्‍हाटे, मेघा देवा वाणी, रमेश नागराणी व इतर नगरसेवक उपस्थित होते. 

 

सौ. सोनी संतोष बारसे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा  सत्ताधारी गटातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे,नगरसेवक सुनिल नेवे,दिनेश नेमाडे,युवराज लोणारी,किरण कोलते,अँड.बोधराज चौधरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Exit mobile version