Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुषण कॉलनीतून विद्यार्थ्यांचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भुषण कॉलनीत शिक्षणासाठी भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, सचिन भगवान मराठे (वय-२१) रा. गणेश पार्क अंकलेश्वर ह.मु. भुषण कॉलनी जळगाव हा विद्यार्थी भाड्याच्या खोलीत राहतो. शहातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता राहत्या खोलीतून अज्ञात चोरट्यांने ६ हजार रूपये किंमतीचा ॲड्रॉईड मोबाईल लांबविला. मित्रांना फोन करून विचारणा केली तरी मोबाईल मिळून आला नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून सविस्तर तक्रार दाखल केली. सचिन मराठे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अशोक सनगत करीत आहे. 

Exit mobile version