Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुषण कॉलनीतून गाय, वासरूची चोरी; अज्ञातांवर गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भुषण कॉलनीत साईराज रेसिडेन्सी येथे बांधलेले गाय वासरू चोरीस गेल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी गोरे मालकाने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

भूषण कॉलनीतील साईराज रेसिडेन्सी येथे जगन तुकाराम गोपाळ वय ४५ हे वास्तव्यास आहेत. साईराज रेसिडेंसी येथेच ते वॉचमन म्हणूनही कामाला आहेत. त्यांच्याकडे गेल्या एक वर्षांपासून गाय व वासरू आहे. १४‍ ऑगष्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता जगन गोपाळ यांनी स्वतः गायीला व वासराला चारा पाणी केले. यानंतर पुन्हा मध्यरात्री साडेबारा वाजता गोपाळ हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांनी पुन्हा गाय व वासराला चारा पाणी दिले. यानंतर ते झोपून गेले पंधरा रोजी सकाळी साडेपाच वस्ता ते फुटले असता त्यांना अपार्टमेंटच्या आवारात बांधलेल्या ठिकाणी गाय व वासरू आढळून आले नाही त्यांनी सर्वत्र परिसरात गाय वासराचा शोध घेतला मात्र मिळून आले नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर जगन गोपाळ यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. भुरकट पांढरा रंग व डाव्या बाजूचे सिंग तुटलेले असे गायीचे वर्णन आहे तर भुरकट पांढऱ्या रंगाचे व सुरू असल्याचे तक्रारीत नमुद आहे. दिले आहे.

Exit mobile version