Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“भुंकणाऱ्या कुत्र्याला बांधून ठेव” सांगण्यावरून तरुणाला लथाबुक्क्यांनी मारहाण

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भुंकणाऱ्या कुत्र्याला बांधून ठेव असे सांगितल्याच्या कारणावरून तरुणाला लथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याची घटना सुप्रीम कॉलनी येथे घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल बाळू कोळी (वय-२४) रा.प्रेमाबाई शाळेजवळ सुप्रीम कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्याच गल्लीतील अमोल मोरे याचा कुत्रा रस्त्यावरून वारंवार भुंकतो व मागे लागतो.

त्यासंदर्भात अमोल मोरे याला सांगितले असता अमोलने राहुल कोळी याला शिवीगाळ व मारहाण करून काठीने मारहाण केली व दुखापत केल्याची घटना गुरुवार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. दरम्यान कुत्रा मी बांधणार नाही, तुझ्याकडून जे होईल ते करून घे, मी पण तुला पाहून घेईल अशी धमकी दिली.

या कारणावरून राहुल कोळी याने शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अमोल मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Exit mobile version