Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भीषन आगीमुळे किराणा दुकानातील लाखोंचा मुद्देमाल नष्ट !

अमळनेर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारवड येथील एका किराणा दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने दुकानातील अंदाजे सात ते आठ लाखांचा मुद्देमाल जळून जागीच नष्ट झाल्याची थरारक घटना आज सकाळी पहाटे उघडकीला आली आहे.

तालुक्यातील मारवड येथील ग्रामपंचायत व्यापारी संकुलात भाडे तत्वावर असलेले राजेंद्र भगवान पाटील उर्फ राजू चोपडेकर यांचे स्वमालकीचे शिव जनरल अँड किराणा दुकान आहे. या दुकानाला आज रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यात दुकानात असलेले रोकडसह साहित्य असा जवळपास अंदाजे सात ते आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तत्पूर्वी संपूर्ण आयुष्य भर राजेंद्र पाटील यांनी किराणा व जनरल स्टोअर्स दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केले आहे. मात्र आज सकाळी लागलेल्या आगीने संपूर्ण दुकानाची राखरांगोळी झाली आहे. आगीत एकही वस्तू हाती न लागल्यामुळे राजेंद्र पाटील व त्यांच्या कुटुंबाने एकच आक्रोश केला. यामुळे अनेकांचे डोळे पाणावले. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्याचेही बोलले जात आहे. हे दुकान ग्राम पंचायतच्या व्यापारी संकुलात व मुख्य बाजारपेठत असल्यामुळे त्यांची गिऱ्हाईकी समाधान कारक होती. याच दुकानात तीन ते चार जणांना रोजगार होता.परंतु आजच्या दुर्दैवी घटनेमुळे या चारही जणांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. तत्पूर्वी आग ही लाईट ट्रिप झाल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version