Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भीषण अपघातात एक जण जागीच ठार; दोन गंभीर जखमी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाकी रोडवर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकते एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील वाकी रोड वर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या अपघातात सोपान आनंदा वाघ (वय-४४) रा. पाळधी ता. जामनेर हे जागीच ठार झाले तर इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, जखमी झालेल्या दोघांना तातडीने जामनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात होता. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version