Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भीमसिंग पावराची आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड

जळगाव, प्रतिनिधी | मंगलोर विद्यापीठ कर्नाटक येथे दि. ४ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान होणाऱ्या आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेकरिता भीमसिंग वाळवी याची ५००० मीटर धावणे स्पर्धेसाठी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड करण्यात आली.

 

केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयाचे भीमसिंग वाळवी यांची आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठीसाठी विद्यापीठ संघात निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा. .निलेश जोशी, जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार, प्रा. प्रविण कोल्हे, प्रा. पंकज पाटील, प्रा. अतुल गोरडे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version