Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भिल्ल समाजबांधवांची हक्काच्या दफनभूमीसाठी आंदोलनाचा इशारा

22

पारोळा, प्रतिनिधी । वंजारी खुर्द गावातील आदिवासी भिल्ल समाजाला प्रेते पुरणाची जागेवर बेकायदेशीर कब्जा केल्याने ती जागा ताब्यात देण्याची मागणी भिल्ल समाजबांधवांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील वंजारी खुर्द येथील आदिवासी भिल्ल समाज बांधवांसाठी शासनाने दिनांक २ ऑगस्ट १९७८ साली गट नंबर २२ मध्ये आदिवासी भिल्ल समाजाला प्रेत पुरण्यासाठी पाच आर पूर्वेकडील जागेत वहिवाट असल्याने इतर हक्कात दाखल घेतल्याचे शासनाचे आदेशावरून नोंद असून देखील शेती मालक कैलास अशोक बारी हे आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रेते पुरवण्याच्या जागेवर वर्षानुवर्षे पेरणी करत आहेत. प्रेते पुरण्यास मज्जा करीत आहेत. गट नंबर २२ मधील ५ आर जागा आठ दिवसात कायदेशीर कब्जा न मिळाल्यास तीन मार्च रोजी वंजारी खुर्द येथील सर्व आदिवासी भिल्ल समाज आपल्या बायको मुलांसह गाई, म्हशी, बकर्‍या, कोंबड्यासह तहसील कार्यालय जवळ आणून हक्काचा असलेली जागेचा जोपर्यंत ताबा मिळत नाही तोपर्यंत उपोषणास करणार आहेत. या जागेचा त्यांना कायदेशीर ताबा मिळवून द्यावा व आदिवासी भिल्ल समाजाला न्याय मिळवून द्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरन कुमार अनुष्ठान, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील तसेच यावेळी समाजबांधव उखर्डू जंगलु भिल, राजू बाबू बिल, अर्जुन धोंडू भिल, शालेय ज्योतीराम भिल, शिवाजी नरसिंग ठाकरे, दादा मांगुळ भिल, सुक्राम शिवलाल भिल, भरत हिरामण भिल, दशरथ पांडू भिल, छबिलदास शत्रू ठाकरे, जंगलु पुन्हा भील, धनराज पांडू भिल, नाथा सुकलाल भिल, चंद्राबाई तानु भिल, तुळसाबाई छबिलाल भिल, निर्मलाबाई देवा भिल, सरुबाई दशरथ भिल, सुमनबाई मांगुळ आदी समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version