Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भिकमचंद जैन मार्केट परिसरातून दुचाकी लांबवली

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भिकमचंद जैन मार्केट परिसरातून दुकानदाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दिलीप बाबुराव काटे (वय-५८) रा. देवीदास कॉलनी यांचे शहरातील नवीन भिकमचंद जैन मार्केटमध्ये काच सेंटरचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता दुकानावर (एमएच १९ सीएम ०१२१) दुचाकीने आले. दुचाकी दुकानाच्या समोर लावलेली असतांना दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. दिलीप काटे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहे.

Exit mobile version