Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भालोद शिवारातून ठिंबक नळ्या व पीव्हीसी पाईपाची चोरी

फैजपूर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या भालोद शिवारातील शेतातून १० हजार रूपये किंमतीच्या ठिंबक नळ्या आणि पीव्हीसी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अधिक महिती अशी की, विद्या नितीन चौधरी (वय-४४) रा. भालोद ता. यावल यांचे भालोद शिवारात शेत गट नं. ३४ जवळील विहिरीजवळ १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता ते १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीच्या ठिंबक नळ्या आणि पीव्हीसी पाईप चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पुढील तपास महेश वंजारी करीत आहे.

Exit mobile version