भालोद बामणोदच्या वांग्याला राज्यासह परराज्यात प्रचंड मागणी

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील भालोद बामणोद व अमोदे येथील भरताची वांगी खान्देशात प्रसिद्ध आहे. त्याची मागणी आता राज्यासह परराज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.

खान्देशात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद बामणोद व अमोदे येथील भरताच्या वांग्याची लागवड जून महिन्यात केली जाते. जून महिन्यात केल्या गेलेल्या वांग्यांचे उत्पन्न हे विजयादशमी दसरा पासून मिळण्यास सुरुवात होत असते. येथील पितांबर गिरधर इंगळे हे शेतकरी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून भरीताच्या वांग्याची लागवड करीत आहेत. वांग्याचे उत्पन्न दरवर्षी मिळवीत आहे. वांग्याची लागवडीपासून तर उत्पन्न मिळेपर्यंत प्रचंड खर्च करून योग्यप्रकारे काळजी घेऊन उत्पन्न मिळवीत आहे. या वांग्यांचे बी वांग्यांच्या झाडावरती चांगले परिपक्व व जातवान वांग झाडावरती पिवळे करून परिपक्व झाल्यावर त्याचे बी काढून जून महिन्यात दरवर्षी वांग्याची लागवड शेतात केली जाते. येथील भरिताची वांगी प्रसिद्ध असून लसलशीत चमकणारी वांग्यांना खव्याची मोठी मागणी असते. थंडीच्या दिवसांवर चवदार भरीत पार्ट्यांना मोठी रंगत येत असते. भालोद सह बामनोद अमोदे येथील वांगे सुद्धा प्रसिद्ध आहे. या भरीत ताज्या वांग्यांना संपूर्ण खान्देश सह नाशिक, मुंबई, औरंगाबाद नागपूर , शेजारच्या गुजरात आणी मध्यप्रदेश या राज्यातील सुरत , बडोदा , अहमदाबाद, खंडवा , इंदौर , भोपाल येथील नोकरीनिमित्त असलेले नागरिक या भरताच्या आस्वादासाठी गावाकडे येऊन भरीत पार्टीचे आयोजन करीत असतात. शेतामध्ये काटयावंर काड्यांवर ही वांगी भाजून व त्यामध्ये जाड मिरची सुद्धा भाजून कोथिंबीर लसुन हे एकत्र ठेचून लाकडाच्या बडगी मध्ये नंतर भाजलेली वांगी सोलून त्यामध्ये ठेचून भरीत केले जाते. या वांग्यांना तेल सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुटत असते. यामध्ये नंतर कांद्याची पात तेलात तळून मिश्रित केली होती. व मोठ्या चवीने भारताचा स्वाद ही मंडळी घेत असते. या वांग्यांना बाजार भाव साधारण शंभर रुपये किलो याप्रमाणे मिळतो तर सध्या वीस ते तीस रुपये किलोप्रमाणे या वांग्यांची विक्री होत आहे.

Protected Content