Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भालशिव येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; अल्पवयीन मुलगा ताब्यात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालशिव येथे एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर गावातीलच अल्पवयीन मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. नराधमास पोलीसांनी अटक केली असून यावल पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, चिमुकलीला यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील भालशिव येथीत तीन वर्षाची चिमुकली आपल्या मोठ्या भावासोबत गल्लीतील मैत्रिणीसोबत गावातील मराठी शाळेत खेळण्यासाठी सकाळी १० वाजता गेली होती. सकाळी ११ वाजाता चिमुकली घरी रडत रडत आली तिच्या आईने विश्वासात घेवून तिला विचारले असता तिने आपल्यावर घडलेला प्रकार सांगितला. तिच्यावर गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवत शाळेच्या पाठीमागे घेवू जात तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला. दरम्यान मुलीच्या ओरडच्या आवाजाने घाबरून संशयित अल्पवयीन मुलाने घटनास्थळाहून पळ काढला. चिमुकलीच्या आई व वडीलांना थेट यावल पोलीस ठाण्यात जावून घडलेला प्रकार सांगितला. चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर यावल पोलीसात भाग ५, भादंवि ३७७, ३२३ आणि ५०६, बालकांचे लैंगिक कायदा ३/४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच यावल पोलीसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील तपास सपोनि जितेंद्र पाटील करीत आहे.

Exit mobile version