भारत मुक्ती मोर्चाचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली(व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणासंदर्भात पोलीसांनी चौकशी आयोगासमोर दिलेल्या व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्यामुळे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरातील जी.एस. मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली प्रदर्शन काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे लाखोंच्या संख्येने जनसमुदाय विजयस्तंभ स्मारकाला मानवंदना देण्यासाठी आलेला होता. त्या जनसमुदायावर संभाजी उर्फ मोहन भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या चिथावण्यावरून दंगलखोर लोकांनी दगडफेक व जाळपोळ केली होती. यासंदर्भात महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. दरम्यान पोलिस प्रशासनाने चौकशी आयोगासमोर वस्तुस्थिती देण्यासाठी स्वतःहून त्यांच्याकडील सर्व पुरावे चौकशी आयोगाचा सादर करणे अपेक्षित होते. परंतु आयोगासमोर वकिलांनी वारंवार मागणी करून व आयोगाने आदेश देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने आयोगासमोर वस्तुस्थिती आणण्यासाठी टाळाटाळ केली आहे. दरम्यान चौकशी आयोगाचा दंगली प्रकरणातील व्हिडिओ सीसीटीव्ह फुटेज यांच्यामध्ये बदल व फेरफार करून अहवाल सादर केला आहे. याच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी रॅली प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी आंदोलनास पाठींबा जाहीर करत रॅलीत सहभाग घेतला. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राजू खरे, सुमित्रा अहिरे, सुनील देहाडे, विजय सुरवाडे, विनोद अडकमोल आदी सहभागी झाले होते.

भाग १

भाग २

भाग 3

Protected Content