Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय लष्कराचे नवीन मेसेजिंग अँप

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराकडून लाँच करण्यात आलेल्या मेसेजिंग अॅप्लिकेशनला ‘Secure Application for the Internet (SAI)’ नाव दिले आहे. हे अॅप इंटरनेट द्वारे अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर अँड टू अँड सिक्योर व्हाईस, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सर्विस सपोर्ट करते.

लष्कराकडून बनवण्यात आलेले हे अॅप व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे आहे. हे अँड टू अँड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करते आहे. SAI लोकल इन-हाउस सर्वर आणि कोडिंग सोबत सिक्यॉरिटी फीचर्स सह बाकीच्या अॅप्सला चांगले बनवते फीचर्सला आवश्यकेनुसार बदलले जावू शकते.

CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुप च्या पॅनल ऑडिटर्स द्वारा चाचणी करण्यात आली आहे. NIC वर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) साठी फायलिंग वर काम सुरू आहे. यासाठी iOS प्लॅटफॉर्म वर अॅप आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. SAI चा पूर्ण लष्करासाठी वापर केला जाणार आहे. या सर्विस सोबत सिक्योर मेसेजिंगची सुरुवात होऊ शकते.

Exit mobile version