Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे महावृक्षारोपण आभियान

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय युवा मोर्चातर्फे शहरातील १०० गणेश मंडळांना २०० वृक्षांचे वाटप आज करण्यात आले. या मंडळांकडून ही रोपे आम्ही जगवू अशी हमी घेण्यात आली.

लावा वृक्ष पसरवा हिरवळ वृक्षमित्र बनुयात पर्यावरणाचे रक्षण करु या उद्देशाने भाजपा युवा मोर्चातर्फे वृक्ष वाटप करण्यात आले. ही मोहीम आ.सुरेश भोळे व भाजपा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली राबविण्यात अली. या वृक्ष वाटपप्रसंगी वृक्षारोपणाचे महत्व पर्यावरणा प्रती आपले सर्वाचे असलेले कर्तव्य याची जाणीव भा.ज.यु. मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी करून दिली.

तसेच ज्या गणेश मंडळांना आपल्या परिसरात वृक्षरोपण करावयाचे असेल त्यांना आ. सुरेश भोळे यांच्या सहकार्याने रोप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, या उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन गणेश मंडळांनी दिले आहे. हा उपक्रम भा.ज.यु.मो जिल्हा माहनगर अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेत राबवण्यात आला.

याप्रसंगी नगरसेवक मयुर कापसे, नगरसेवक प्रविण कोल्हे, मंडल अध्यक्ष संजय लुल्ला, अनिल जोशी शक्ती महाजन,याचे सहकार्य लाभले. भा.ज.यु.मो. सरचिटणीस महेश पाटील, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, गणेश महाजन, राहुल मिस्त्री, राहुल लोखंडे , प्रतिक शेट, सागर बोरोले, विशाल गोयल, रोहित सोनवणे, यश किंग्रानी ,गौरव पाटील,भुषण पाटील, विनय सोनार ,पुष्पेंद्र जोशी,ऋषिकेश येवले, मुकेश पाटील, गौरव येवले, जयंत चव्हाण यानी हा उपक्रम यशस्वी होण्यास प्रयत्न केले.

Exit mobile version