Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीयांच्या भावनांची चीनने उडविली खिल्ली !

नवी दिल्ली । भारतातील एक वर्ग हा चायनीज प्रॉडक्टच्या विरोधात असला तरी आमच्या वस्तूंशिवाय भारतातील नागरिक राहूच शकत नसल्याचा दावा तेथील सरकारी मीडियाने केला आहे. या माध्यमातून चीनने भारतला खिजवल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मेड इन चायना प्रॉडक्टवर बंदी घालण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी आवाहन केल्यानंतर याला गती आली आहे. मात्र चीन याला फारसे गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे. ग्लोबल टाईम्स या चिनी सरकारची मालकी असणार्‍या वर्तमानपत्राने यावर भाष्य करत भारताला खिजविले आहे. यात म्हटले आहे की, काही अतिदेशप्रेमी भारतीयांमुळे चीनविरोधी वातावरण निर्माण होत आहे. काही जण आमच्या वस्तूंविरोधात अफवा पसरवत आहेत. पण या वस्तूंवर बहिष्कार घालणं एवढं सोपं नाही. या वस्तू भारतीय सामाजातील अविभाज्य भाग बनल्या आहेत. आता हा सात हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार आहे. भारतातील काही अतिराष्ट्रवादी पक्ष सातत्याने चीनला बदनाम करण्याचा कट आखत असतात. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम पहिल्यांदाच घडलेली नाही. पण आम्ही भारताला समजावू इच्छितो की याचा काहीच उपयोग होणार नाही आणि हे शक्य देखील नाही.

Exit mobile version