Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताने अफगाणिस्तानला दिलेले हेलिकॉप्टर तालिबान्यांच्या ताब्यात

 

काबुल : वृत्तसंस्था ।  भारताने अफगाणिस्तानला भेट दिलेल्या हेलिकॉप्टरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे.

अफगाणिस्तानमधील कांडुजमधून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे हेलिकॉप्टर तालिबानी लढाऊ हेलिकॉप्टरच्या शेजारी दिसत आहे. या हेलिकॉप्टरचे रोटर ब्लेड गायब आहेत. हे ब्लेड तालिबानने हेलिकॉप्टरचा वापर हल्ला करण्यासाठी वापरू नये, यासाठी पूर्वीच अफगाणिस्तानच्या सैन्याने काढून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

२०१९ मध्ये भारताने अफगाण हवाई दलाला तीन चित्ता हेलिकॉप्टर्ससह Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर भेट दिले होते. Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर २०१५ मध्ये अफगाणिस्तानला भेट देण्यात आलेल्या चार लढाऊ हेलिकॉप्टरच्या बदल्यात देण्यात आले होते.

 

अफगाणिस्तानचे नेतृत्व हल्लेखोरांचा सामना करण्यासाठी संघर्ष करत असताना हे हेलिकॉप्टर तालिबानने ताब्यात घेतले आहे. सद्यस्थितीत अफगाणिस्तानच्या ६५ टक्के भूभागावर तालिबानने नियंत्रण मिळवले आहे. गुरुवारी तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानातील प्रांतीय राजधानीतील पोलीस मुख्यालय ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. काबुल पासून १५० किलोमीटरवर असलेल्या गजनी शहरावरही तालिबानने ताबा मिळवलाय. अफगानिस्‍तानमधून अमेरिकन आणि नाटो सैनिक हटल्यानंतर तिथं तालिबान्यांचं वर्चस्व वाढलं असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे अफगानिस्‍तानमधून लोक पलायन करत आहेत.

Exit mobile version