Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतात २४ तासात १ लाखापेक्षा जास्त आढळले कोरोना बाधित

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था ।  देशात चौथ्या दिवशी देखील एका दिवसात कोरोना बाधितांची संख्या १ लाखापेक्षा जास्त आली आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने शनिवार सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात शुक्रवारी २४ तासांत १ लाख ४४ हजार ८२९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३२ लाख ०२ हजार ७८३ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ६८ हजार ४६७ नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (५८ हजार ९९३), छत्तीसगड (११ हजार ४४७), उत्तर प्रदेश (९ हजार ५८७), दिल्ली (८ हजार ५२१), कर्नाटक (७ हजार ९५५), तामिळनाडू (५ हजार ४४१), केरळ (५ हजार ०६३) या राज्यांत आढळले आहेत. तसेच २४ तासांत तब्बल ७७३ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.

 

Exit mobile version