Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतात नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । भारतात नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचलीय, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

भारतासह जगात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोनाच्या नव्या अवतारामुळं ब्रिटन, जर्मनीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. भारतातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येंने दीड लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. मंगळवारी भारतात कोरोनामुळे २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १ लाख ५० हजार ११४ वर पोहोचली आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत ३ लाख ६५ हजार ६२० जणांनी जीव गमावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून तिथे १ लाख ९७ हजार ७७७ जणांचा मृत्यू झालाय. भारतामध्ये आतापर्यंत १ लाख ५० हजार ११४ जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय.

भारतात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी १६ हजार ३७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. हा गेल्या काही महिन्यामंधील सर्वात कमी आकडा आहे. भारतातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सलग १६ व्या दिवशी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी राहिली आहे.

भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६ . ३५ टक्केंवर पोहोचला आहे. मंगळवारी देशभरात २१ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशातील 97 लाख ९९ हजार २७२ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत १० व्या स्थानावर आहे .

Exit mobile version