Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतात धर्म, संस्कृती, सहकार्य जोपासले जाते म्हणून महामारी ही संपुष्टात येत आहे — प.पु. सुरीश्वरजी महाराज

चोपडा प्रतिनिधी । पाश्चिमात्य देश सोडून भारतात धर्म, संस्कृती, सहकार्य, परंपरा हे पाहायला मिळेल त्यामुळेचं  १३० कोटी जनता असून देखील कोराना काळात  इतर देशापेक्षा भारतात मृत्यूदर कमी होते.

भारत ही देवी – देवतांची, साधू- संतांची भूमी आहे. या देवीदेवतांमुळे साधू संतांच्या संस्कारा मुळेच आज आपण जिवंत राहिलो आहोत, भारताचे आभूषणच धर्म आहे भारताची खरी ओळख धर्मावरच होत असते भारतात कोणत्याही धर्माचा माणूस हा देवीदेवतांना मानतो धर्माचे पालन करतो म्हणूनचं इतर देशा पेक्षा जगात भारताला महत्त्व आहे आणि त्यामुळेच कोराना सारखी महामारी ही संपुष्टात येत आहे.कोराना काळात कोण कोणाची मदत करत होते हे सुध्दा एकमेकांना माहीत नव्हते. फक्त आपले संस्कार, संस्कृती, शिकवण हे करायला लावत होते त्यामुळेच आज आपण जिवंत दिसत आहोत असा मौलिक सल्ला  केसरसुरी संप्रदायाचे आचार्य प.पु. राजरत्न सुरीश्वरजी महाराज यांनी येथील श्री मुनीसुव्रतस्वामीं जैन श्वेतांबर मंदिराच्या प्रवचन हॉल मध्ये प्रवचनात बोलताना दिला. 

सकाळी अडावदकडून विहार करत आशा टॉकीज रोड वरून चोपड्यात ढोल ताशांच्या गजरात व उद्घोषणा देत जैन केसरसुरी संप्रदायाचे आचार्य प.पु. राजरत्न सुरीश्वरजीचे महाराज व त्यांचे शिष्य प.पु. धर्मरत्न विजयजी महाराज यांचे भव्य प्रवेश झाले त्याचे ठीक- ठिकाणी  त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी त्याच्या सोबत सुशिष्या प.पु.दिव्यरत्नाश्रीजी महाराज आदी ठाणा ३ यांच्याही भव्य प्रवेश झाले यावेळी जैन समाजाचे शेकडो भाविक हजर होते. त्यांनी प्रवचनात श्रीयंत्र महापुजनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितले. जैन धर्माचा कोणताही साधू पैसे कसे वाढतील ते सांगणार नाही परंतु धर्म प्रसारासाठी सक्षम परिस्थिती आवश्यक आहे, पैसे असेल तरच भक्तही धर्माचा प्रसार करू शकतो त्यामुळे भक्तांचे फायदा व्हायला हवा म्हणूनच श्रीयंत्र महापूजनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले. केसरसुरी संप्रदायाचे चतुर्विध संघाचा भव्य प्रवेशा वेळी शेकडो जैन बांधव हजर होते.

Exit mobile version