Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताच्या मदतीत सारेच देश अपयशी — डॉ. अँथनी फौची

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । कोरोनाच्याविरुद्ध लढण्याकरिता भारताला पुरेशी मदत करण्यात जगभरातील देश अपयशी ठरले असून मदतीचा हात देण्याबाबत श्रीमंत देशांनी अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी, असे व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी म्हटले आहे.

 

जागतिक महासाथीचा  मुकाबला  जगभरातून प्रतिसादाच्या मार्गानेच  केला जाऊ शकतो आणि जागतिक प्रतिसाद म्हणजे जगभरातून समन्यायी मदत होय. तथापि, दुर्दैवाने हे साध्य झालेले नाही. तुलनेने श्रीमंत असलेल्या किंवा अधिक उत्पन्न असलेल्या सर्व देशांना याबाबतीत अधिक लक्ष घालायला हवे, असे डॉ. फौची यांनी  सांगितले. भारतात  कोरोना महासाथीने थैमान घातलेले आहे. अशावेळी किमान १७ देश भारताला मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत  त्यात शेजारी देशांपासून जगातील महासत्तांचा समावेश आहे.

 

भारताने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या  लशीमध्ये कोरोनाच्या ६१७ या प्रकाराला निष्प्रभ करण्याची क्षमता असल्याचे आढळले आहे, त्यामुळे भारतात अनेक अडचणी असतानाही  ही लस अतिशय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक औषध ठरू शकते, असेही मत डॉ. फौची यांनी व्यक्त केले.

Exit mobile version