Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे अभिवादन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या बळीराम पेठेतील ‘वसंत स्मृती’ जिल्हा कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, सचिव प्रा. भगतसिंग निकम, ज्योती लिंबोरे, वंदना पाटील, अक्षय चौधरी, धिरज वर्मा, प्रकाश पंडित, अमित देशपांडे, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, अनिल जोशी, लता बाविस्कर, स्नेहा निंभोरे, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version