Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप मंत्री बी. श्रीरामुलुंच्या मुलीचा शाही विवाहसोहळा ; ५०० कोटीपेक्षा जास्त खर्च

बंगळुरु (वृत्तसंस्था) कर्नाटक सरकारमधील आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यावर तब्बल ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. यामुळे बी. श्रीरामुलु हे देशभरात चर्चेत आले असून दशकातील हा सर्वात महागडा विवाह सोहळा असल्याचे बोलेले जात आहे.

बी. श्रीरामुलु यांची मुलगी रक्षिताचा येत्या 5 मार्चला विवाह आहे. या विवाह सोहळ्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, या विवाह सोहळ्यावर तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जात असल्याची माहिती आहे. या विवाह सोहळ्यावर होणाऱ्या खर्चाबाबत कोणीही अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. तरी सूत्रांनुसार, या लग्नावर जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नापेक्षा जास्त खर्च होणार असल्याची माहिती आहे. जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. श्रीरामुलु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच पक्षाच्या इतर सर्व नेत्यांसह तब्बल एक लाख लोकांना आमंत्रण दिले आहे.

Exit mobile version