Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप नेत्यांचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ ! : प्रवीण दरेकर

वर्धा । भाजपच्या नेत्यांचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ आहे, यामुळे चौकशीच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर वर्धा दौ-यावर आले आहेत. यावेळी वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

याप्रसंगी दरेकर म्हणाले की, आधी तुम्हाला काय चौकशा करायच्या त्या करून घ्या. मग तुमच्या १०० नव्हे १२० नेत्यांची यादी आपण देऊ, त्यांच्याही चौकशा होऊनच जाऊ द्या, असे आव्हान संजय राऊत यांनी बुधवारी दिले. त्यावर दरेकर म्हणाले, संजय राऊत यांनी यादी देऊ, असं बोलून दोन दिवस झाले. राऊत यांनी यादी देण्यासाठी मुहूर्त बघू नये. तत्काळ यादी देऊन टाका. उशीर करू नका नाहीतर आपण बोलघेवडे आहात, असा समज होईल. सत्य जनतेपुढे येऊ द्या, अशी टीका दरेकर यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सरकारमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. आतून हे सरकार खूप पोखरले आहे. या विसंवादातून हे सरकार कोसळेल, त्यावेळी भाजप सक्षम पर्याय म्हणून चांगले सरकार देऊ शकेल. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागेल, त्यावेळी जनतेचा कौल कळेल, असा दावा दरेकर यांनी केला.

Exit mobile version