Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे कोरोनाने निधन

 

खंडवा, वृत्तसंस्था । देशात कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला असतांना कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होतांना दिसत आहे. यातच मध्य प्रदेशमधील खंडवाचे भाजपचे खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नंदकुमार सिंह चौहान हे खंडवा मतदारसंघाचे भाजपचे खासदार होते. नंदकुमार सिंह चौहान यांनी सहावेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले होते. तर दोन वेळा त्यांनी आमदारकीही भुषवली आहे. तसंच चौहान सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा राहिले होते. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सुद्धा भुषवले होते.

 

Exit mobile version