Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी जयेश भावसार

भुसावळ प्रतिनिधी । भाजपा जिल्हा महानगराची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झालेली असून आता महानगरच्या अंतर्गत विविध आघाड्यांच्या अध्यक्ष निवड घोषित करण्यात आली. त्यात ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी जयेश प्रकाश भावसार यांची निवड महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी केली.

जयेश भावसार यांचे शिक्षण बी.ई.कॉम्प्युटर झाले असून १९९० पासून भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच ते निर्मल फाऊंडेशनचे अध्यक्ष असून ते प्रधानमंत्री प्रचार प्रसार अभियानाचे उत्तर विभागीय युवक अध्यक्ष सुद्धा होते. २०१९ विधानसभा निवडणुकी मध्ये त्यांनी साहित्य प्रमुख ची जब्बब्दारी त्यांच्यावर होती.

त्यांच्या या निवडीबद्दल आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, आमदार सुरेश भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खा. उन्मेष दादा पाटील, खा.रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढाव डॉ. राजेंद्र फडके, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी सभापती सुचिता हाडा यांनी आभिनंदन केले.

Exit mobile version