Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण

पुणे (वृत्तसंस्था) भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर हे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

 

योगेश टिळेकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची कोविड-१९ ची तपासणी करून घेतली होती. तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला असून माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे त्यांनी ट्विट केले आहे. शनिवारी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मोहोळ यांनी देखील स्वतः आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, योगेश टिळेकर यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Exit mobile version