Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा महिला मोर्चातर्फे ‘रास्ता रोको’ आंदोलन (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी  । भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे नंदनवन कॉलनी मित्र मंडळ येथे श्री गणपतीची आरती महिला आघाडीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा, यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी  महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उद्धव ठाकरे महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी देवो असे साकडे करण्यात आले.

महिला आघाडी उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांच्या नेतृत्वात दिप्ती चिरमाडे यांच्या अध्यक्षतेत महिला मोर्चा तर्फे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात उद्धव सरकार यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.  गणेश कॉलनी पेट्रोल पंप येथे रस्ता रोको आंदोलन करून विरोध प्रकट करण्यात आला.   महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यात सरकारअपयशी ठरले आहे.  सात महिन्यात पाचशेपेक्षा महिलांवर अत्याचार आणि घटना नोंदविल्या गेल्या असून अजूनही शासनाला जाग आलेली नाही. महाराष्ट्र शासनाने केंद्रा प्रमाणे शक्ती  कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी महिला आघाडी अध्यक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.  कठोर नियम करून अशा अत्याचारांना उपाय योजना असा आक्रोश मोर्चा तर्फे व्यक्त करण्यात आला. दोन वर्षे उलटूनही महाराष्ट्र शासनाने अजून पर्यंत महिला आयोग अध्यक्ष नेमणूक केली नाही व महिलांप्रती शासनाचा दुजाभाव दिसून येतो.  महिलांच्या सुरक्षितेसाठी  योग्य उपाययोजना न केल्यास भाजपा महिला मोर्चा शांत बसणार नाही  तीव्र आंदोलन करू असे इशारा देण्यात आले.  या आंदोलनात जिल्हा पदाधिकारी वंदना पाटील, रेखा पाटील, ज्योती निंभोरे, पूजा चौधरी, नगरसेविका प्रतिभा कापसे, दीपमाला  काळे, महिला आघाडी चे छाया सारस्वत, तृप्ती पाटील, व इतर महिला पदाधिकारी सहभाग नोंदविला.  जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी  नगरसेवक महेश चौधरी, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख धीरज वर्मा, मनोज (पिंटू)  काळे, मयुर कापसे, यूवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, जयंत चौहान, स्नेहा निंभोरे, रूपेश राणे, सनी पटेल, भुषण काकुस्ते उपस्थित होते.

 

भाग १

भाग २

Exit mobile version