Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा जिल्हा महानगरतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा

 

जळगाव, प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिन भाजपा जिल्हा महानगरतर्फे आज महानगरातील नऊ मंडलामध्ये साजरा करण्यात आला.

भाजपा जळगाव महानगरतर्फे भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे “शिवराज्याभिषेक “दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडल क्र२ चे अध्यक्ष परेश जगताप, सुनीलभैय्या माळी, प्रकाशजी पंडीत, कपिल पाटील, राहुल घोरपडे आदी उपस्थित होते.भाजप मंडळ क्रमांक १ शिवाजी नगर परिसर यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मण्डल अध्यक्ष रमेशभाऊ जोगी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. याप्रसंगी सरचिटणीस शांताराम गावंडे, नगरसेवक नवनाथभाऊ दारकुंडे, राजूभाऊ मराठे, संजय अकोलकर, राहुल साळुंके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version