Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा जिल्हा बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदांचा ठराव पारित

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा व महानगर बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदांचा ठराव पारित करण्यात आला. हा ठराव माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत खासदार उन्मेष पाटील यांनी मांडला होता.

 

भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली जी.एम.फाउंडेशन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव खासदार उन्मेष पाटील यांनी मांडला. यावेळी ठराव मांडतांना खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले की, आज भारत देश हा महासत्तेकडे जाताना दिसत असून मोदींचे नेतृत्व हे जगमान्य झाले. त्याच प्रमाणे आमदार मंगेश पाटील यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण याविषयी ठराव मांडला. यावेळी त्यांनी सांगितले की, आज पोलिसलाच सरकारच्या मंत्रीचा शोध घेण्याचे काम करावे लागत असल्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण की गुन्हेगारांचे सरकार असे आज दिसत. यानंतर आमदार संजय सावकारे यांनी राजकीय ठराव मांडत असतांना आज आरक्षण व शेतकऱ्यांच्या, कामगारांचे प्रश्न याकडे लक्ष न देता दुसरीकडे लक्ष वेधण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला. भारतीय जनता पार्टीचे विभागीय संगठन मंत्री रविजी अनासपुरे यांनी पक्षाच्या आगामी कार्यक्रमची माहिती दिली.

त्यात लसीकरणाचे १००% पूर्ण करण्यासाठी जिल्हाभरात आरोग्य रक्षक काम करतील. . घरोघरी जाऊन १००% लसीकरण करून घ्यावे. . प्रत्येक गावात २६ नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करावा.

या बैठकीत २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान गौरव रथाचे उद्घाटन माजी मंत्री आ.गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) आणि अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. या बैठकीत माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी आगामी काळात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्ते जनतेत जाऊन केंद्रस रकार वपंतप्रधान नरेंद्र मोदि यांची कामगिरी जनतेत सांगा व आजचे महाराष्ट्राचे सरकार व आपले नेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार यांची तुलना आपण जनतेत करावी व शेतकरी व कामगारांच्या प्रश्नावर आक्रमण व्हा अशा सूचना दिल्यात.

या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.स्मिता वाघ, जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील, माजी आमदार डॉ. डी. एस. पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, माजी जि.प. अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, डॉ. राजेंद्र फडके, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदु महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, के. बी. साळुंखे, पद्मकर महाजन, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, प्रदेश पदाधिकारी, त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते. प्रास्ताविक जळगाव महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील व मधुकर काटे यांनी केले. महानगर सरचिटणीस राजेंद्र घुगे पाटील यांनी आभार मानले.

Exit mobile version