Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा खोटारडा, विखारी, कांगावाखोर पक्ष — सचिन सावंत

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर परखड शब्दांमध्ये  टीका  केली आहे. “भाजपा हा खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.  अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी हे ट्वीट केलं आहे.

 

देशात सध्या असलेल्या कोरोना व्हायरसला मोदी व्हायरस  किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत आहे. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यानंतर आता काँग्रेसनं भाजपाला प्रत्युत्तर दिलं

 

 

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संबंधित टूलकिट ट्विटरवरून शेअर करत काँग्रेसला सुनावलं होतं. “काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा, असे आदेश यातून काँग्रेसनं कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते. वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते”, असं अतुल भातखळकरांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

आता त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपा हा अत्यंत खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे. टूलकिट हे बनावट आहे. काँग्रेसतर्फे जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यात अतुल भातखळकर यांचं नावही देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागाळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे”, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. अतुल भातखळकर यांच्या ट्वीटवर त्यांनी हे ट्वीट केलं आहे.

 

 

 

 

अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलेल्या टूलकिटवर उजव्या कोपऱ्यात काँग्रेसचा लोगो दिसत आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याची ही संधी आहे असं नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबतच कोरोना व्हायरसचा उल्लेख सोशल मीडियावर करताना कोरोनाचा भारतीय स्ट्रेन किंवा मोदी स्ट्रेन असा करण्याबाबत देखील उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, हे टूलकिटच बनावट असल्याचा दावा आता काँग्रेसकडून भाजपाच्या आरोपावर करण्यात आला आहे.

 

Exit mobile version