Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपाला देशात ऐक्य नको आहे हे शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वीच सांगितले होते : राऊत

मुंबई प्रतिनिधी | भाजपला देशात ऐक्य नको आहे हे शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वीच सांगितले होते, मात्र ते दोन वर्षांपूर्वी आमच्या लक्षात आल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पवार यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत पार पडला. सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं  नेमकचि बोलणें या पुस्तकाचं लेखन केलं आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. शिवसेना खासदार संजय राऊतही यावेळी उपस्थित होते. भाषणादरम्यान बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली केली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा जो आपण ग्रंध निर्माण केला आहे त्याला भगवे कव्हर आपण घातले आहे त्याबद्दल मी आभारी आहे. हे सरकार अवघा रंग एकची झाला असे आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

राऊत पुढे म्हणाले की, आपल्या देशामध्ये जे विकृत राजकाराण सुरु आहे त्यावरसुद्धा शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहेत. भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. सोशल मीडियावर मी शरद पवारांना दिल्लीत खुर्ची बसायला दिली त्यावरुन फार टीका करण्यात आल्या. पण त्यांना बसण्यासाठी मी खुर्ची का दिली हे समजून घ्यायचे असेल त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हा ग्रंथ वाचल्यावर कळेल माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे. यामुळे आपण खुर्ची दिल्याचे राऊत म्हणाले.

 

Exit mobile version