Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपातर्फे महापुरुषांची जयंती साजरी

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती तसेच सेवा व समर्पण अभियान’अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना स्वस्त धान्य दुकानावर (रेशन दुकान) भारतीय जनता पार्टी तर्फे  लाभार्थ्यांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त यांच्या पुतळ्याला गांधी उद्यान येथे तर लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त यांच्या पुतळ्याला टाँवर चौक येथे  माल्यार्पण भारतीय जनता पार्टी जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा  आ. राजूमामा भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.  भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे ‘सेवा व समर्पण अभियान’अंतर्गत महानगरातील ९ मंडल मंडलातील हुतात्मा यांच्या पुतळ्याच्या परिसराची मंडळात व शहरात साफ सफाई करत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याच बरोबर महानगरातील सर्व मंडलांमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना स्वस्त धान्य दुकानावर (रेशन दुकान) लाभार्थ्यांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. तर यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, महानगर उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, महानगर चिटणीस तथा सेवा व समर्पण अभियानाचे प्रमुख राहुल वाघ, राजेंद्र मराठे, विठ्ठल पाटील, कार्यालयीन मंत्री प्रकाश पंडित, नगरसेवक धिरज सोनवणे, नगरसेविका सुचिता हाडा, दीपमाला  काळे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष जयेश भावसार, अनुसूचित जाती अध्यक्ष लता बाविस्कर, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, शांताराम गावंडे, युवा मोर्चाचे दिनेश पुरोहित, चेतन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version