Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपाच्या संघर्षामुळे धार्मिकस्थळ उघडण्यात यश : उमेश फेगडे

यावल,  प्रतिनिधी |  कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारी संकटाच्या पार्श्वभुमीवर आघाडी शासनाने दिर्घ काळापासुन बंद असलेले राज्यभरातील सर्व मंदीर अखेर प्रतिक्षेनंतर भाजपाच्या संघर्षामुळे  आजउघडण्यात आल्याचा दावा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सर्व देवी-देवतांना कडी कुलुपात बंद करून ठेवले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने  राज्यात करण्यात आलेले आंदोलन व संघर्षामुळे ठाकरे सरकार वठणीवर आले आणि आता घटस्थापनेला म्हणजेच आज दि.७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मंदिराचे टाळे उघडण्यात आले आहे असे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी सांगितले.या निमित्ताने  तालुक्यातीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सातपुडा निवासिनी आदीशक्ती श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर, आडगाव तालुका यावल येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाआरती करण्यात आली व पूजेचे साहित्य विक्री करून आपली उपजीविका भागवणाऱ्या दुकानदारांना पेढे वाटप केले.  भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण क्रिडा सभापती रविन्द्र पाटील ( छोटु भाऊ ), भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत ,पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा कांचन फालक, जिल्हा परिषद सदस्यां सविता  भालेराव , डांभुर्णीचे उपसरपंच पुरुजीत गणेश चौधरी, पंचायत समिती सदस्य दिपक अण्णा पाटील, उपसभापती पंचायत समिती योगेश भंगाळे,  विलास पाटील, अतुल भालेराव, नीता साठे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अॅड. शरद कोळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, नितीन फन्नाटे (टेलर), शिवा मराठे, नितीन सपकाळे, जयवंत बेंडाळे, योगेश धांडे, अमोल कोळी, सचिन कोळी आदी या वेळी उपस्थित होते.

Exit mobile version