भाजपाची मराठा समाजाशी गद्दारी — सचिन सावंत

मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कागदपत्रे ट्विट करून #SaveMeritSaveNation भाजपा व संघाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. सावंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही सवाल केला आहे.

 

 

 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एका ऐरणीवर आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून ठाकरे सरकारची कोंडी केली जात असल्याचं दिसत आहे. आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचा दावा भाजपाकडून केला जात असून, राज्यातील सत्ताधारी पक्ष हे केंद्राच्या अधिकारात असल्याचं सांगत आहेत.  भाजपाकडूनच मराठा आरक्षणाला विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

 

मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालाय रद्द केला. त्यानंतर राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली. राज्य सरकारने नीट बाजू मांडली नसल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. तर आरक्षण रद्द व्हावं म्हणून भाजपाकडून प्रयत्न केले गेले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावरून आता वाद रंगला असून, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भाजपाशी आणि संघाशी संबंधित असल्याचं गौप्यस्फोट केला आहे.

 

सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी असल्याचे कागदपत्रे ट्विट केली आहेत. “मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?,” असा संतप्त सवाल सावंत यांनी केला आहे.

 

Protected Content