Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचं नवं युट्यूब चॅनेल

bjp congress

 

नवी दिल्ली:  वृत्तसंस्था ।  भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने आयएनसी टीव्ही हे नवं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून हे चॅनेल सुरू करण्यात आलं  चॅनेलद्वारे सत्य सांगण्यात येणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

 

काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत हे चॅनल सुरू करण्यात आलं आहे. या चॅनेलद्वारे लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवली जाणार आहे.  देशातील विविध समस्यांवर या चॅनेलद्वारे फोकस देण्यात येणार आहे, असं  सांगण्यात आलं. हे चॅनेल युट्यूब, फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडियावर उपलब्ध राहणार आहे. या चॅनेलद्वारे काँग्रेसची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.  केंद्र सरकारची पोलखोल करण्यात येणार असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

 

चॅनेल लॉन्च केल्यानंतर या चॅनेलवरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. ही डॉक्युमेंट्री काँग्रेसच्या सर्व राज्यातील ट्विटर हँडलवरून रिट्विट करण्यात आली आहे.

 

काँग्रेस नेते आणि राज्यातील मंत्री सतेज पाटील यांनी ट्विट करून या चॅनेलची माहिती दिली आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ च्या आजच्या जमान्यात सत्य सांगायला स्वतःचे प्लँटफॉर्म हवेतच. आयएनसी टीव्हीद्वारे देशातल्या जनतेला सत्य समजून घ्यायला नक्की मदत होईल याची खात्री आहे. हे चॅनेल “लोकांचा आवाज” म्हणून ओळखले जाईल असा विश्वास वाटतो, असं ट्विट सतेज पाटील यांनी केलं आहे

 

 

Exit mobile version