Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपमधील सामूहिक नेतृत्व संपल्याचा दावा

मुंबई: वृत्तसंस्था । भाजपमधील सामूहिक नेतृत्व संपल्याचा दावा करत एकनाथराव खडसे यांनी सांगितलं.की , ‘२०१४ पर्यंत गोपीनाथ मुंडे, बापट, फुंडकर, मी, मुनगंटीवार असे नेते, कार्यकर्ते एकत्र तासन् तास चर्चा करायचो. बहुमताने निर्णय व्हायचे. निर्णय मनाविरुद्ध असला तरी मान्य करायचो. अलीकडे ही प्रक्रिया भाजपमध्ये बंद झालीय,’

‘भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा असं चित्र सध्या आहे. त्यामुळं पक्षात प्रचंड नाराजी आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही स्वत:चे निर्णय घेता येत नाहीत. त्यांनाही फडणवीसांचा सल्ला घ्यावा लागतो,’ असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ‘मन की बात’ सांगितली. त्यानंतर आज भाजपमधील अंतर्गत राजकारणावर प्रकाश टाकला. पर्याय नसल्यामुळं अनेक जण माझ्याकडे बोलतात ,’ असं खडसे म्हणाले.

‘माझ्यासोबत भाजपचे १० ते १२ आमदार आहेत. पण ते आता येणार नाहीत, कारण आता निवडणुका परवडणार नाहीत. त्याशिवाय, १५ ते १६ माजी आमदार राष्ट्रवादीत येणार आहेत. त्यातील काही उद्या माझ्यासोबत येतील. सहकारी संस्था व पालिकांमधील अनेक पदाधिकारी माझ्यासोबत आहेत,’ असं खडसे यांनी सांगितलं.

Exit mobile version