Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपने केला नाना पटोले यांचा निषेध (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन करून भाजपतर्फे निषेध करण्यात आला.

 

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगरच्या वतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून रॅली काढून टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात हे आंदोलन जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे, उपाध्यक्ष अमित भाटिया, महिला आघाडी अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा, सरोज पाठक, सनाताई खान, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, जिल्हा सह प्रसिद्धीप्रमुख धीरज वर्मा, ग्रामीणचे अरुण सपकाळे, गोपाल भंगाळे, राजू सोनवणे, जहांगीर खान, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, सरचिटणीस संजय तिर्माले, आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, लता बाविस्कर, दिपक बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, राहुल लोखंडे, राहुल मिस्त्री, जयंत चव्हाण, विकी सोनार, शुभम बाबा, योगेश पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version