चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून निषेध

 

 

भुसावळ : प्रतिनिधी । राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांच अभिनंदन केल्यावर  हिटलरशाही पध्दतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी धमकी देणे निषेधार्ह असल्याचे  राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी म्हटले आहे

 

 

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे पुढे म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी भारतीय जनतेला कोरोना महामारीमधुन बाहेर काढण्याऐवजी  केवळ पश्चिम बंगालची सत्ता मिळविण्यासाठी संपुर्ण देशाला वेठीस धरले, देशाच्या   आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा धुरळा उडवला यावर जगभरातुन प्रचंड टिका झाली. राजकारणाच्या परंपरा गुंडाळुन ही निवडणुक लढविली. अशा स्थितीत ममता बॅनर्जी यांनी सक्षमपणे लढत देवुन भाजपचा निवडणुकीत धुव्वा उडवून,तिसर्‍यांदा सत्ता कायम राखली.

 

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी सुरूवातीपासुनच या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठींबा दिलेला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे वतीने सर्व नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले  ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करून त्या  झाशीच्या राणीप्रमाणे जिद्दीने  लढल्या आणि  एकहाती विजय मिळविला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे  छगन भुजबळ यांनी दिली होती .

 

मात्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांनी  ममता बॅनर्जीचे अभिनंदन केले म्हणुन चक्क धमकी दिली होती  तूम्ही जामिनावर सुटलेला आहात . तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलु नका अन्यथा फार महागात पडेल असे ते म्हणाले होते .

 

चंद्रक्रांत पाटील यांनी हुकुमशहाच्या तोर्‍यात भुजबळ यांना धमकी दिली, त्यावरून भाजपाने लोकशाहीमधील राजकीय मर्यादा सोडुन दादागिरीचा गुंडगिरीच्या प्रवृत्तीचा स्विकार केलेला आहे असे दिसते. देशभरात भाजप विरोधात लाट तयार झाल्याची जाणीव भाजपेयींना झाली आहे. महाराष्ट्रातील जनता याचा वचपा भाजपकडुन घेतल्याशिवाय राहणार नाही , असेही उमेश नेमाडे म्हणाले .

चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना जी धमकी दिली ते भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचे प्रतीक आहे. चंद्रकांत पाटील हे राजकारणातील विश्वासघाती व्यक्तिमत्त्व आहे, नाथाभाऊनी राजीनामा दिल्यावर हे पालकमंत्री झाले, तेव्हा रामाच्या पादुका सांभाळणार असल्याचे वक्तव्य ह्या लबाडांनी केले होते. आणि तिकडे  नाथाभाऊंना फसवण्याचा प्रयत्न करत होते  अशा लबाड माणसाला कोल्हापूरकरांनीही नाकारले आहे. मी चंद्रकांत पाटील यांचा निषेध करून त्यांच्या धमकी वक्तव्याचा जाहीर धिक्कार करतो , असेही ते म्हणाले . चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची व  भुजबळ यांची जाहीर माफी मागावी अशी मागणीही  उमेश नेमाडे यांनी  केली आहे ..

Protected Content