Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपच्या वर्धापनदिनी शहरात ४३ शाखांचे उदघाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरात पक्षाच्या तब्बल ४३ शाखांचे उदघाटन करण्यात आले.

 

भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे जळगाव शहरामध्ये भव्य शाखा उद्घाटन सोहळा वार्ड क्र.१ पासून सुरुवात झाली.  यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी , याच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राधेश्याम चौधरी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ,आनंद सपकाळे हे प्रमुख उपस्थित होते.

 

दरम्यान, दिवसभरात शहरात एकूण ४३ शाखांचे उदघाटन करण्यात आले. यासोबत  प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच्या उपस्थितीत हि शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पक्षाचे सरचिटणीस, अक्षय जेजुरकर मिलिंद चौधरी , नगरसेवक राजेन्द्र मराठे, डॉ चंद्रशेखर पाटील,मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, ललित बडगुजर, सुरेखाताई तायडे, गणेश सोनवणे ,उपाध्यक्ष राहुल मिस्त्री , स्वामी पोतदार ,चिटणीस ,अश्विन सैदाणे रोहित सोनवणे ,सागर जाधव ,  यवा प्रसिद्धी प्रमुख गौरव पाटील , मंडळ अध्यक्ष दिनेश पुरोहित , शिवा कांडारे ,सागर पोळ, पंकज गागडे , समर्थ राणे , निरज जैन , शाखा प्रमुख ,प्रशांत बडगुजर ,आर्यन शेट , आदित्य पाटील, बबलू कोळी ,भूषण पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version