Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपच्या वतीने पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त (व्हिडिओ )

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | काल राज्यसभेचे निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपच्या तीन उमेदवारांना घवघवीत यश मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

चुरशीच्या लढतीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच आ. गिरीश महाजन यांच्या आत्मविश्वासातून भाजपला यश मिळाले आहे. या निवडणुकीत आघाडी सरकार विषयी आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. यात अपक्ष आमदारांसह आघाडीतील घटक पक्षातील आमदारांचा समावेश असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी आधाडीतील पक्षातील सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत असल्याने आगामी विधान परिषदेत गुप्त मतदानाचा भाजपला लाभ होईल असा दावा यावेळी केला. आनंदोत्सव साजरा करतांना गटनेता भगत बालानी, उज्वला ताई बेंडाळे प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा पदाधिकारी सुभाष तात्या शौचे, अरविंद देशमुख, महेश चौधरी, ज्योतीताई निंबोरे, रेखाताई कुलकर्णी, बापू ठाकरे, प्रकाशजी पंडित, धिरज वर्मा, गणेश माळी, योगेश पाटील, वंदनाताई पाटील, मंडळ अध्यक्ष संजय लुल्ला, आघाडी पदाधिकारी दिप्तीताई चिरमाड़े, रेखाताई वर्मा, सरोज पाठक, ज्योती राजपूत, शोभा कुलकर्णी, छाया सारस्वत, ज्योती बर्गे, युवा मोर्चा पदाधिकारी भूषण भोळे, मिलिंद चौधरी, दिशांत दोशी, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरिकर, सागर पाटील, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version