Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

ठाणे (वृत्तसंस्था) भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

 

मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्याच एका नगरसेविकेने नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार कोकण महानिरीक्षकांकडे केली होती. त्यानंतर मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री साडेतीन वाजता मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत नगरसेविका महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलेय की, मेहता यांच्याशी माझे लग्नही झाले असून त्यांच्यापासून मला एक मुलगाही आहे. १९९९ पासून ते २०२० पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माझे लैंगिक शोषण केले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी माझा वापरही करून घेतला होता. माझ्याप्रमाणेच मेहता यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे, असा आरोप पिडीत महिलेने केला आहे. दरम्यान, नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचेही पीडित नगरसेविकेने म्हटले आहे.

Exit mobile version