Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात – नवाब मलिक

4Nawab Malik 14

मुंबई प्रतिनिधी । भाजपच्या माजी मंत्र्यांसह अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना नवाब मलिक म्हणाले की, भाजपाची लाट ओसरली असून त्यांच्यातील अनेक माजी मंत्री राष्ट्रवादी, शिवसेनेत येण्यात इच्छुक आहेत. येत्या आठवडाभरात मोठे फेरबदल झाल्याचा पाहायला मिळतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तापालट होईल अशी बातमी पेरली जात आहे. महाराष्ट्राचे नेते दिल्लीत प्रचार करत आहे मात्र त्यांची बोट महाराष्ट्रातच बुडणार असल्याचा दावा नवाब मलीक यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपमध्ये गेलेले अनेक नेते घरवापसी करणार असल्याचे संकेतदेखील मलिक यांनी दिले. पक्षासाठी इतकी मेहनत घेऊनही आपल्यावर अन्याय झाला अशी भावना असणारे नेतेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहे असे ते म्हणाले.

Exit mobile version