Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपचे आंदोलक पोलिसांवर चिडले !

 

 

जळगाव राहूल शिरसाळे । पोलिसांनी आकाशवाणीला लागून असलेल्या  सर्व्हिस रोडने इच्छा देवी चौकाकडे  जाणारी वाहतूक सुरु केल्यामुळे चक्काजाम आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते चिडले होते

 

शहरातील आकाशवाणी चौकात ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपाकडून  चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

 

याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील , जितेंद्र मराठे , सूचिता हाडा , दीपमाला काळे   यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

 

भाजपतर्फे आकाशवाणी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येत असतांना पोलिसांनी वाहतूक आकाशवाणीला लागून असलेल्या  सर्व्हिस रोडने इच्छा देवी चौकाकडे   सुरु केली. होती. यामुळे आंदोलकांनी तेथे धाव घेतली. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आम्ही शांततेत आंदोलन करत असतांना वाहतूक का वळविण्यात आली असा प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी यावेळी उपस्थित केला होता  आम्ही पोलिसांना आंदोलनस्थळ सांगितले   ही आमची चूक झाली का ? असा प्रश्न भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी उपस्थित केला होता .

 

एकीकडे हा गोंधळ सुरु असतांना खासदार रक्षा खडसे यांनी एसटी महामंडळाची बस कार्यकर्त्यांच्या मदतीने  अडवून  चक्का जाम आंदोलन केले. काही कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसेसला भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून राज्य सरकारच्या निषेधार्थ  घोषणाबाजी केली.

 

Exit mobile version