Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपची सत्ता असलेल्या नगरपरिषेदतच सीएए, एनआरसीविरोधात ठराव मंजूर

परभणी (वृत्तसंस्था) भाजपच्या ताब्यात असलेल्या परभणीच्या सेलू नगरपालिकेने चक्क सीएए, एनआरसीविरोधात ठराव मंजूर केल्यामुळे राज्यभरात याची चर्चा रंगली आहे.

परभणीच्या सेलू नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा 28 फेब्रुवारी रोजी पार पडली. ज्यात स्वतः भाजपचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीला (एनपीआर) विरोध असल्याचा विषय मांडला ज्यावर सर्व सदस्यांनी चर्चा केली आणि शेवटी नगरसेवक अब्दुल वहिद हमीद यांनी अनुमोदन दिले आणि सभागृहात उपस्थित असलेल्या २८ पैकी २६ नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या. केवळ शिवसेनेचे नगरसेवक मनीष कदम आणि आशा दिशागत यांनी पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठींना विचारुन मग आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत.

Exit mobile version