Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाकरी तिजोरीत बंद होऊन नये म्हणून हे आंदोलन आहे — राकेश टिकैत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : । चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, भाकरी तिजोरीत बंद होऊन नये म्हणून हे आंदोलन आहे

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जामला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर येत वाहतूक रोखली आहे. आंदोलकांनी पंजाब, हरयाणात जाणारे महामार्ग बंद केले. गाझीपूर बॉर्डरवरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं असून, “देशातील शेतकऱ्यांना मातीशी जोडू, नव्या युगाचा जन्म होईल,” असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हटलं आहे.

”देशभरात शांततेत चक्का जाम आंदोलन सुरू झालं आहे. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडणार आहोत. यातून नव्या युगाचा जन्म होईल. इथे राजकारण करणारे नाहीत. कुठे दिसत आहेत. इथे कुणीही येत नाहीये. हे जनआंदोलन आहे. भाकरी तिजोरीत बंद होऊन नये म्हणून हे आंदोलन आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही गोंधळ घालणारे होते, त्यामुळे तिथे चक्का जाम करण्यात आलेला नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही ऑक्टोबर पर्यंत इथेच बसून आहोत,” असा इशाराही टिकैत यांनी केंदर् सरकारला दिला.

१२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये या राज्यांना चक्का जाम आंदोलनातून वगळण्यात आलं असून, उर्वरित देशभरात आंदोलन सुरू झालं आहे. ‘चक्का जाम’च्या काळात अत्यावश्यक सेवेतील आणि शाळेच्या बस व रुग्णवाहिकांना जाऊ दिलं जाणार आहे.

चक्का जाम आंदोलनापूर्वी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीच्या सीमेवर तिन्ही आंदोलन ठिकाणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. .

चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर काही आंदोलकांनी बंगळुरूमधील येलहांका पोलीस ठाण्यासमोर येऊन धरणे देण्यास सुरूवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कृषी कायद्यांविरोधात पंजाब हरयाणामध्ये सुरूवातीपासूनच रोष उमटताना दिसत आहे. आजच्या चक्का जाम आंदोलनाला पंजाबमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. संगरूर जिल्ह्यातील मूनाक-तोहना महामार्गावर महिलांनी ठिय्या देत वाहतूक रोखली.

 

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जामला जम्मूमध्येही प्रतिसाद मिळला. आंदोलकांनी रस्त्यावर येत जम्मू-पठाणकोट महामार्ग रोखला.

कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकर्‍यांनी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. पुण्यातही आंदोलन करण्यात आलं. हडपसर येथील शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं.

Exit mobile version