भाऊसाहेब राऊत विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भाऊसाहेब राऊत विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देवून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

भाऊसाहेब राऊत विद्यालयात पहिल्या दिवशी बुधवार दि. १५ जून रोजी विद्यार्थ्याचे औक्षण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन ढोल ताश्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एल. एस. तायडे, पर्यवेक्षक एस. एम. रायसिंग, ए. एस. बाविस्कर, श्रीमती पी. व्ही. बाविस्कर यांच्या हस्ते पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विनोद कोळी, प्रकाश मेंढे, रवींद्र कोळी, राजेश जाधव, संगिता शिरसाटे, वैशाली नारखेडे, अंजू पगारे, कैलास म्हसाणे, विशाल सोनावणे , रतिलाल पाटील, राजू ठाकरे, कैलास सपकाळे, सागर हिवराळे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार ग्रंथपाल राजू ठाकरे यांनी मानले.

Protected Content