Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालयास आ. रोहित पवार यांची सदिच्छा भेट !

धरणगाव,प्रतिनिधी| जळगावच्या दौऱ्यावर असलेले कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालयाला आज सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे उत्साहात स्वागत करुन विद्यालयाची माहिती दिली.

 

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जळगावहुन अमळनेर येथे कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालयात सदिच्छा भेट दिली. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी , गावातील प्रतिष्ठित नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी रोहित पवार यांनी विद्यालयाच्या कॅम्पसला भेट देऊन तेथील सोईसुविधांबाबत समाधान व्यक्त करत प्रतापरावजी पाटील यांच्या सोबत चर्चा केली. तसेच शाळेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. कंखरे, इंग्लिश मेडियमचे प्राचार्य सचिन पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांची उपस्थिती होती.

 

Exit mobile version