Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपरने वार

जळगाव प्रतिनिधी । भावाचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपरने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी रात्री शिवाजी नगर हुडको परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

याबाबत महिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील लकी जितेंद्र पवार हा त्याच्या मावस भाऊ आर्यशील उर्फ सोनू दिलीप अहिरे हे दोघ शिवजीनगर हुडको भागात रविवारी रात्री ८ वाजता बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. यावेळी या ठिकाणी उभा असलेला चिन्यायाने या दोघांना तुम्ही याठिकाणी मुली बघण्यासाठी येता का ? असे म्हणत चिन्या व त्याची पत्नी टिनाबाई, मुलगा साई यांच्यासह दोन जणांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ते दोघ युवक त्याठिकाणाहून कशीबशी सुटका करुन ते घाबरलेल्या अवस्थेत घरी गेले.

दोघांनी घडलेली सर्व घटना मोठा भाऊ रितेश याला सांगितली असता. रितेश याने त्या दोघांसह त्यांच्या गल्लीतील गजानन वाघ, सागर वाघ व बंटी नामक तरुणांना सोबत घेवून तो शिवाजीनगर हुडको परिसरातील बुद्धविहाराजवळ आले. याठिकाणी चिन्या हा त्याच्या घराजवळ उभा होता मारहाण केल्याचा जाब व समझोता करणासाठी रितेश हा चिन्याजवळ गेला असता. चिन्याचा मुलगा साई, टिनाबाई व अन्य दोन जणांनी आर्यशील याला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.

जीवेठार मारण्याची धमकी देत पोटात खुपसले चॉपर
समझोता करण्यासाठी गेलेत्या रितेशसह त्याच्या भावाला टिन्या व त्याच्या कुटुंबियांकडून मारहाण करीत होते. याचवेळी बबल्या नामक युवकाने तुम्ही याठिकाणी दिसले तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही. असे म्हणत त्याने त्याच्या खिशातील चॉपर काढीत रितेश याच्या पोटात खुपसून त्याच्या हातावर वार करीत गंभीर जखमी केले.

भांडण सोडविण्यसाठी गेलेल्या तरुणाच्या पोटात चॉपर खुपसल्याने याठिकाणी काही प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी लकी याने त्याच्यासोबत असलेल्यांचया मदतीने रिक्षात टाकून रितेशला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी चिन्या त्याची पत्नी टिनाबाई, मुलगा साई व बबल्या व मन्या सर्व रा. शिवाजीनगर हुडको याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. यातील मुख्य संशयीत आरोपी टिन्या याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version